Home बातम्या सीमारेषेच्या मुद्द्यावरूनराहुल गांधी झाले आक्रमक

सीमारेषेच्या मुद्द्यावरूनराहुल गांधी झाले आक्रमक

0

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, काल संसदेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषेचा मुद्दा उपस्थित करत, काही प्रश्न विचारले. तसेच, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा संदर्भ देत मोदी सरकारला भारतीय सीमारेषेसंदर्भाने सवाल केला. या मुद्द्यावरून सरकार अडचणीत येणार असल्याने संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी थेट हस्तक्षेप करत राहुल गांधींना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात जोरदार गोंधळ झाला.