सीबीआयच्या संचालकपदी प्रवीण सूद यांची निवड

0
5

कर्नाटकचे विद्यमान पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे (सीबीआय) संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीआयचे विद्यमान प्रमुख सुबोधकुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सूद 25 मे रोजी पदभार स्वीकारतील. डीजीपी प्रवीण सूद हे 1986 च्या बॅचचे कर्नाटक केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. शनिवारी, पंतप्रधान नकरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सीबीआय संचालकपदासाठी तीन नावांची निवड केली होती. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडे पाठवण्यात आलेली निवडलेली नावामध्ये प्रवीण सूद यांच्यासह सुधीरकुमार सक्सेना, (डीजीपी, मध्य प्रदेश) आणि ताज हसन (महासंचालक, अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक) यांचा समावेश होता.