सीझेडएमपीमध्ये बंदर मर्यादा नसावी : नीलेश काब्राल

0
27

किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्या (सीझेडएमपी) मध्ये बंदर मर्यादा दाखवू नये, या मताचा आपण असून, केंद्र सरकारकडे तशी मागणी करणार असल्याचे पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांनी काल सांगितले.

संपूर्ण गोव्यासाठी बंदर मर्यादा ही सीझेडएमपीमध्ये दाखवली जाऊ नये. ती केवळ एमपीटी क्षेत्रापुरती मर्यादित असायला हवी. अन्य राज्यात देखील तशी मर्यादा दाखवण्यात आलेली नाही, असे काब्राल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्याची विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन तमनार वीजवाहिनी प्रकल्प हा उभारावाच लागेल, असेही काब्राल यांनी सांगितले.