संपूर्ण देशभरात रविवार दि. १ नोव्हेंबरपासून सिलिंडर बूकिंग, बँक चार्ज तसेच रेल्वे वेळापत्रकाच्या नियमांत महत्त्वाचे बदल होणार आहेत.
१ नोव्हेंबरपासून सिलिंडर बूक केल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. सिलिंडर घरी येईल तेव्हा सिलिंडर पोहोचवणार्यांना तो ओटीपी द्यावा लागेल. सिस्टममध्ये त्या ओटीपीची पडताळणी केल्यानंतर ग्राहकांना सिलिंडर देण्यात येईल. जर ग्राहकांचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक चुकीचा असला तर त्यांना सिलिंडर मिळणार नाही. त्यामुळे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अपडेट करण्याचे आवाहन कंपन्यांनी केले आहे. हा नियम घरगुती सिलिंडरसाठी आहे.
पैसे काढण्यासाठी शुल्क
बँकांमध्ये आता पैसे ठराविक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम काढल्यास यापुढे ग्राहकांना शुल्क द्यावे लागणार आहे. कर्ज खात्यासाठी जे ग्राहक तीन वेळापेक्षा अधिक वेळा रक्कम काढतील त्यांना १५० रूपये शुल्क द्यावे लागणार आहे. तर बचत खात्यांमध्ये ग्राहकांना केवळ तीन वेळा पैसे जमा करता येतील. परंतु चौथ्यांदा पैसे जमा करायचे असल्यास ग्राहकांना ४० रूपये मोजावे लागतील. दरम्यान, १ नोव्हेंबरपासून देशात धावणार्या १३ हजार प्रवासी रेल्वे आणि ७ हजार मालगाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे.