ऊस उत्पादकांची थकित रक्कम सोमवारपर्यंत देणार ः मुख्यमंत्री

0
285

राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊस कापणीची थकीत रक्कम सोमवारपर्यंत वितरित करण्याचे आश्‍वासन काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या एका शिष्टमंडळाने काल भेट घेऊन विविध समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी खास समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या समस्यांवर तोडगा काढला जाणार आहे. मागील गळीत हंगामातील तोडण्यात न आलेल्या ऊसासाठी नुकसानभरपाई लवकरच दिली जाईल. संजीवनी साखर कारखाना बंद केला जाणार नाही. नवीन कारखाना उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शिष्टमंडळाला सांगितले.