Home बातम्या साबांखाचे ३ अभियंते निलंबित

साबांखाचे ३ अभियंते निलंबित

0

या अधिकार्‍यांची नावे कार्यकारी अभियंता ए. जी. भौंसले, सहाय्यक अभियंते शुभकुमार के. सी. व कनिष्ठ अभियंता संदीप कारखानीस अशी आहेत. आणखी काही अधिकार्‍यांच्या निलंबनाचा आदेश सोमवारी जारी होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी दोनापावला येथील गुन्हा अन्वेषण विभागातील एका महिला पोलीस शिपायाच्या विनयभंग प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सावंत वादग्रस्त बनले होते. वरील महिला पोलीस शिपायाने तक्रार केल्यानंतर पो. रीना तोरकादो यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी केली होती. चौकशीअंती सावंत दोषी असल्याचा प्रथमदर्शनी पुरावा मिळाल्याने सरकारच्या शिफारशीनुसार दक्षता खात्याने सावंत यांना पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे. या प्रकारामुळे पोलीस खात्यात खळबळ माजली आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरील अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई म्हणून निलंबित केले आहे. सत्तरीतील वांते भिरोंडा पंचायत क्षेत्रातील एका खासगी मालमत्तेत संबंधित मालकाकडून ना हरकत दाखला न घेता रस्त्याचे बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. वांते-भिरोंडा येथील प्रमोद जोशी नामक एका जमीनमालकाने वरील प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे व त्यानंतर मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती. त्याची चौकशी सुरू झाली असून अधिकार्‍यांविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे सापडल्यानेच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

दक्षता खात्याने निलंबित केलेल्या अधिकार्‍यांची संख्या आता सहावर पोचली आहे. सर्वप्रथम खात्याने बेकायदेशीर खनिज प्रकरणी खाण खात्याच्या संचालकपदावरून अरविंद लोलयेकर यांना तर साबांखाचे कार्यकारी अभियंता पी. टी. पारकर यांना निविदा घोटाळा प्रकरणी निलंबित केले होते.