सांकवाळ हल्लाप्रकरणी एका संशयितास अटक

0
39

सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्ते उद्योजक नारायण दत्ता नाईक यांच्यावर शनिवारी करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी रामगोपाल यादव ऊर्फ करिया (४०) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी लवकरच तपास लागण्याची शक्यता आहे. मुख्य संशयित रामगोपाल यादव ऊर्फ करिया हा झरीत – सांकवाळ इथला असून वेर्णा पोलिसांनी त्याला काल अटक केली. त्याची आता कसून चौकशी केली जात आहे. हल्ला झाल्यानंतर करिया हा नारायण यांच्या मदतीला धाऊन गेला होता.

नारायण नाईक यांच्यावर शनिवारी जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये त्यांच्यावर लोखंडी सळीने दोन अज्ञातांनी येऊन हल्ला केला. यामध्ये नारायण दत्ता नाईक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे. दरम्यान, नारायण नाईक यांच्यावर रात्री उशिरा शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.