गोव्यात बेकायदेशीर वास्तव करून राहिलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांची परत बांगलादेशात पाठवणी करण्यात आली आहे. विदेशी नोंदणी प्रादेशिक कार्यालय आणि सीमा सुरक्षा दल यांनी संयुक्त विद्यमाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी नागरिकांकडे वैध कागदपत्रे नव्हती. त्यांच्याविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.