Home बातम्या मनी लाँड्रिंग प्रकरणी7 कोटींची मालमत्ता जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरणी7 कोटींची मालमत्ता जप्त

0

अंमलबजावणी संचालनालयाच्या पणजी विभागीय कार्यालयाने अमलीपदार्थ तस्करी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सुमारे 7.17 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. 2021 मध्ये एनसीबीने नोंदविलेल्या गुन्ह्यात उगोचुकवू सोलोमन उबाबुको, इन्फिनिटी जॉन ऊर्फ डेव्हिड आणि प्रसाद वाळके यांच्याविरोधात अमलीपदार्थ विक्रीचा ठपका ठेवण्यात आला होते. या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली होती. अमलीपदार्थांच्या तस्करीतून मिळालेला पैसा वाळके आणि त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात रोख स्वरूपात जमा केला जात असल्याचे तपास आढळून आले. या पैशातून मालमत्तेची खरेदी करण्यात आली होती. ईडीने आसगाव बार्देश येथील एक तीन मजली निवासी घर आणि दोन मजली दोन घरे तात्पुरती जप्त केली आहेत.