सर्व ट्रकांना काम हवे

0
85

>> खनिज ट्रक मालकांची मागणी

 

धारबांदोडा परिसरातील ट्रकमालक व खाण कंपनी अधिकार्‍यांच्या काल झालेल्या बैठकीत सर्व ट्रकांना काम देण्याची मागणी ट्रकमालकांनी केली. मात्र, दरवाढीवर कोणतीच चर्चा झाली नाही. ही बैठक पूर्वी ठरल्यानुसार झाल्याचे बैठकीचे अध्यक्ष सरपंच बालाजी गावस यांनी सांगितले.
पावसाळ्यात खनिज वाहतूक बंद ठेवण्यासाठी केलेल्या आंदोलनावेळी धारबांदोड्यातील ट्रकमालकांनी चतुर्थीनंतर खनिज वाहतूक सुरू करण्यापूर्वी वेदांता कंपनीच्या अधिकार्‍यांशी बैठक घेण्याचे ठरले होते. त्यानुसार काल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेदांता कंपनीतर्फे वरिष्ठ अधिकारी जोजफ कुएल्हो उपस्थित होते. परिसरातील सुमारे २५ ट्रक मालकांनी आपल्या मागण्या कंपनीसमोर ठेवल्या.