पूर्णवेळ संरक्षणमंत्री हवा : कॉंग्रेस

0
96

देशाला पूर्णवेळ काम करणार्‍या संरक्षण मंत्र्याची गरज आहे, असे सांगून संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आपला जास्तीत जास्त वेळ गोव्यात राजकारण करण्यात खर्च करीत असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरीलप्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी कवठणकर यांनी केली. काश्मीरमधील उरी येथील लष्करी मुख्यालयावर अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनीच अधिकार्‍यांची बैठक घेतल्याचे राष्ट्रीय वृत्त वहिन्यांवर झळकले होते असे त्यांनी सांगितले.