Home Featured सर्व काही राख होईल असा हल्ला करू

सर्व काही राख होईल असा हल्ला करू

0

>> रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा युक्रेनला इशारा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी असा हल्ला करू की, सर्वकाही राख होऊन जाईल असा इशिरा दिला आहे. रशियावर युक्रेनने चार हजार किमी आत घुसून केलेल्या द्रोन हल्ल्यांद्वारे रशियाची 40 विमाने नष्ट केली. त्यानंतर रशियाने वरील इशारा दिला आहे. यात पुतीन यांनी, आम्ही खूप सहन केले, आता रशिया गप्प बसणार नाही. रशिया आता लक्ष्य निश्चित करत असून ते युक्रेनच्याही पलीकडे असू शकते असे म्हटले आहे. त्यामुळे अमेरिका, युरोप व नाटो देशांना हा धोका मानण्यात येत आहे.

हल्ल्याची रशियाकडून पुष्टी
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने युक्रेनने केलेल्या द्रोन हल्ल्यांमध्ये देशभरातील पाच लष्करी हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यात अनेक विमानांचे नुकसान झाल्याची पुष्टी देण्यात आली. तथापि, नुकसान झालेल्या विमानांची नेमकी संख्या देण्यात आलेली नाही. रशियन विमाने वारंवार युक्रेनियन शहरांवर बॉम्ब टाकत असल्याने त्यांनी स्वसंरक्षणार्थ हा हल्ला केल्याचे युक्रेनने म्हटले आहे. या हल्ल्याला रशियाने पुष्टी दिली असून यामुळे रशियाचे 17 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

रशिया थांबला नाही तर आणखी हल्ले ः युक्रेन
रशियन विमाने जवळजवळ दररोज रात्री युक्रेनियन शहरांवर हल्ला करतात, त्यामुळे रशियन बॉम्बस्फोट थांबवण्यासाठी त्यांनी हा हल्ला केल्याचे युक्रेनियन एजन्सीने म्हटले आहे. या हल्ल्यामुळे रशियाचे खूप नुकसान झाल्याचे युक्रेनचे म्हणणे असून रशिया थांबला नाही तर असे द्रोन हल्ले करतच राहू असा इशारा दिला आहे.