सरन्यायाधीशपदी सूर्य कांत यांचा शपथविधी संपन्न

0
3

देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी काल शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्य कांत यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्याकडे पुढील 15 महिने सरन्यायाधीशपदाचा कार्यभार असेल. सूर्य कांत हे सरन्यायाधीश पदावर 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत राहतील. मावळते सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आता सूर्य कांत यांची सरन्यायाघीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कलम 370 रद्द करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरिकत्व हक्कांवरील प्रकरणांच्या सुनावणीत त्यांचा सहभाग होता.
सूर्य कांत यांचा शपथविधी ऐतिहासिक ठरला; कारण या शपथविधी सोहळ्याला सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित होते. भूतानचे मुख्य न्यायमूर्ती ल्योनपो नोरबू शेरिंग, केन्याच्या मूख्य न्यायमूर्ती मार्था कूमे, मलेशियाच्या संघीय न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नलिनी पथमनाथन, मॉरिशसच्या मुख्य न्यायमूर्ती बीबी रेहाना मुंगली-गुलबुल, नेपाळचे मुख्य न्यायमूर्ती प्रकाश मान सिंह राऊत यावेळी उपस्थित होते.