सरन्यायाधीशपदी दत्तू शपथबध्द

0
111

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून लक्ष्मीनारायणस्वामी दत्तू यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल शपथ दिली.
राष्ट्रपती भवनमधील दरबार हॉलमध्ये एका छोटेखानी समारंभात ६३ वर्षीय न्या. दत्तू यांनी शपथग्रहण केले. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, मंत्री रवी शंकर प्रसाद, एम. व्यंकय्या नायडू, अनंतकुमार, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी तसेच कॉंग्रेसचे नेते अभिषेक मनू सिंघवी व राजीव शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते. भारताच्या सरन्यायाधीशपदावरून शनिवारी निवृत्त झालेले न्या. आर. एम. लोढा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश तसेच उच्च न्यायालयांचे निवृत्त न्यायाधीश यांचाही उपस्थितांमध्ये समावेश होता. २जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी तपासकामावर देखरेख ठेवणार्‍या खंडपीठाचे प्रमुख म्हणून दत्तू काम पाहत आहेत. भारताच्या सरन्यायाधीशपदावरील त्यांचा कार्यकाल १४ महिन्यांचा असून २ डिसेंबर २०१५ रोजी ते निवृत्त होतील.