सरकारी कर्मचार्‍यांना बायोमॅट्रीक हजेरीतून तात्पुरती सवलत

0
47

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी कर्मचार्‍यांना येत्या १५ जुलै २०२१ पर्यत बायोमॅट्रीक हजेरीतून सवलत देण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी कर्मचार्‍यांना बायोमॅट्रीक हजेरी सवलत देण्यात आलेली आहे. यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला आहे. ताप, थंडी, खोकला असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांनी घरी राहावे व वैद्यकीय सल्ला घेण्याची सूचना करण्यात आली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे सरकारी कर्मचार्‍यांना २२ जूनपासून तीन दिवस ऑनलाइन कोविड केअर वर्ग घेतला जाणार आहे. या वर्गात फक्त १०० जणांना प्रवेश दिला जाणार आहे.