सरकारने नेमलेल्या समितीस ‘फोर्स’ चा तीव्र विरोध

0
107

>> सावियो लोपिस यांची घोषणा

 

अनुदान प्रश्‍नावर अभ्यास करण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या १७ सदस्यीय समितीस ‘फोर्स’चा तीव्र विरोध असल्याचे निमंत्रक सावियो लोपिस यांनी सांगितले.
भाजप सरकारने माध्यमाच्या विषयावर अनेक समित्या स्थापन केल्या. त्यातून जनतेची दिशाभूल करणे व निर्णय लांबणीवर टाकणे हा एकमेव हेतू आहे. हा निवडणूक स्टंट असल्याचे सांगून विधानसभेत यासंबंधी मांडलेले विधेयक संमत केलेच पाहिजे, असे ते पुढे म्हणाले. अनुदान रद्द केल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा लॉपीस यांनी दिला आहे. जनतेचा सरकारवर विश्‍वास नाही. शिक्षण माध्यम हा पालकांचा विषय आहे, असेही ते म्हणाले.
प्रा. भास्कर नायक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या निर्णयावर ‘फोर्स’ आक्रमक झाला आहे. त्यामुळे काल फोर्सने येथील चर्च सभागृहात पालकांची सभा घेतली व अनुदान रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.