माध्यमाचा विषय लांबणीवर टाकण्यासाठीच तज्ज्ञ समिती

0
62

>> भाभासुमंची प्रखर टीका

 

२०१७ ची निवडणूक नजरेसमोर ठेवून जनतेची दिशाभूल करण्यासाठी व शैक्षणिक माध्यमाचा विषय लांबणीवर टाकण्यासाठीच सरकारने १७ सदस्यीय समिती स्थापन केल्याची टीका भाभासुमंचे नेते ऍड. उदय भेंब्रे यांनी काल केली. फोर्स  ही संस्कृतीभ्रष्ट लोकांची संघटना असून सरकार या संघटनेला बळी पडले आहे, असे ते म्हणाले.
इंग्रजी प्राथमिक शाळांचे शैक्षणिक अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची गरजच नाही. इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय घेताना कॉंग्रेस सरकारनेही समिती स्थापन केली नव्हती व नंतर ते सुरू ठेवताना भाजप सरकारनेही समिती स्थापन केली नव्हती. अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. तो प्रशासकीय निर्णय आहे. त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याच्या २९ व्या कलमाखाली स्थापन केलेल्या वरील समितीला अर्थ नाही. ही समिती प्रशासकीय निर्णय घेऊ शकत नाही, असे भेंब्रे म्हणाले.
देशी वृत्ती विकसित होऊ नये म्हणून फोर्स चा मातृभाषेतून शिक्षण देण्यास विरोध आहे. त्यांच्या या धोरणाचा समाजावर विपरित परिणाम होईल, असे भेंब्रे यांनी सांगितले.