सरकारतर्फे लवकरच सार्वजनि तक्रार निवारण कक्ष सुरू करणार

0
52

>> मुख्यमंत्र्यांची माहिती

गोवा सरकारच्या वेगवेगळ्या योजना व सेवा यांचा लाभ घेणार्‍या लोकांना ज्या अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्या लोकांची गार्‍हाणी ऐकून घेण्यासाठी गोवा सरकार लवकरच सार्वजनिक तक्रार निवारण कक्ष सुरू करणार असल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

सरकारी योजनांचा अथवा सेवांचा लाभ घेताना आपणाला अनंत अडचणींचा सामना करावा लागतो किंवा आपणाला सरकारी खात्यातील विविध अडचणी वा सेवा व योजनांचा लाभच घेता येत नाही अशी जर कुणी सरकार विरोधात तक्रार केली तर सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लोकांच्या हितासाठी असलेल्या सार्वजनिक योजना ह्या लालफितीत अडकून पडता कामा नयेत, असे ते पुढे बोलताना म्हणाले.