सरकारकडून सहा दुरुस्ती विधेयके विधानसभेत सादर

0
11

राज्य सरकारकडून काल विधानसभेत सहा दुरुस्ती विधेयके सादर करण्यात आली. अधिवेशनाच्या पुढील दोन दिवसांत या विधयेकांवर चर्चा होऊन त्यांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गोवा शेत जमीन हस्तांतरण निर्बंध विधेयक 2023 सादर केले आहे. त्यात या विधेयकाच्या माध्यमातून शेतजमिनीचे संरक्षण करण्यासाठी शेतजमीन विक्रीवर निर्बंध घालण्यात येणार आहे. तसेच बाबूश मोन्सेरात यांनी गोवा अनधिकृत बांधकाम (दुरुस्ती) नियमन विधेयक 2023 सादर केले. नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा नगर आणि नियोजन (दुसरी दुरुस्ती) विधेयक 2023 सादर केले. सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी गोवा महामार्ग कायदा विधेयक 2023 सादर केले. नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा नगरपालिका (दुरुस्ती) विधेयक 2023 सादर केले. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी गोवा लेजिसलेटिव्ह डिप्लोमा (दुरुस्ती) विधेयक 2023 सादर केले.