समुद्रात बुडणार्‍या ३७ जणांना जीवदान

0
7

मिरामार येथे समुद्रात गुरुवारी रात्री १० च्या सुमारास एक मच्छिमारी ट्रॉलर बुडाला. या ट्रॉलरवरील ३७ कामगारांना दृष्टीचे जीवरक्षक आणि स्थानिक मच्छिमारांनी सुखरूपपणे समुद्रातून बाहेर काढले. मालिम-बेती जेटीवरील हा ट्रॉलर समुद्रात मासेमारीसाठी निघाला होता; मात्र मिरामार येथील समुद्रातील उंच लाटांमध्ये तो अडल्याने बुडाला. मध्यरात्री १ वाजेपर्यंत समुद्रात बुडालेल्या ट्रॉलरमधील मच्छिमारांना सुखरूपपणे समुद्रकिनार्‍यावर आणण्याचे काम करण्यात आले.