सत्यार्थी, मलाला यांना आज नोबेल पुरस्कार

0
100

भारतातील सुप्रसिद्ध बाल हक्क विषयक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी व पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना अन्य ११ जणांसह आज यंदाचे शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारामुळे बालकांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याच्या कामात आपल्याला या पुरस्कारामुळे बळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया ६० वर्षीय सत्यार्थी यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानात मुलींसाठी शिक्षण अत्यावश्यक असल्याचे जनमानसात बिंबवण्यात झोकून कार्यरत असलेल्या मलाला हिच्यावर तेथे प्राणघातक हल्ला झाला होता.