सचिवांच्या नेमणुका जाहीर

0
27

राज्य मंत्रिमंडळाच्या खाते वाटपानंतर आता राज्यातील ११ आयएएस अधिकार्‍यांकडे विविध खात्यांच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून, त्याबाबत काल आदेश जारी करण्यात आला.

मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांच्याकडे दक्षता, गृह, पर्सनल, बांधकाम, नागरी विमान वाहतूक, खाण, वित्त, वन आणि नगरनियोजन या प्रमुख खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पी. एस. रेड्डी यांच्याकडे बंदर, नदी परिवहन, मत्स्योद्योग, वजन माप, पुरातत्त्व ही खाती देण्यात आली आहेत. संजय गिहार यांच्याकडे जलस्रोत, ग्रामीण विकास, पंचायत, गृहबांधणी, नोडल अधिकारी एसबीएम (आर) आणि पीएमएवाय (आर), कला व संस्कृती, सार्वजनिक तक्रारी, नागरी पुरवठा, छापखाना, गोवा राज्य बालकल्याण आयोग या खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

चोखा राम गर्ग यांच्याकडे कायदा व न्याय, विधिमंडळ व्यवहार, कौशल्य विकास, सहकार, पीपीपी विभाग, उद्योग, हस्तकला या खात्याचा कारभार देण्यात आला आहे. रमेश वर्मा यांच्याकडे महसूल, माहिती आणि प्रसिद्धी, कामगार आणि रोजगार या खात्याची जबाबदारी दिली आहे. रवी धवन यांच्याकडे शिक्षण, कंपनी आणि बाष्पक, आदिवासी विकास, पर्यटन खात्याचा कारभार सुपूर्द करण्यात आला आहे. डॉ. तारीक थॉमस यांच्याकडे नगरविकास. वाहतूक, विज्ञान व तंत्रज्ञान, सीईओ – ईएसजी या खात्याचा कारभार देण्यात आला आहे.

अरुण कुमार मिश्रा यांच्याकडे समाज कल्याण, पर्यावरण, शेती, पशुसंवर्धन, राजभाषा, गोवा गॅझेटर या खात्याचा कारभार देण्यात आला आहे. यू.व्ही.व्ही.जे. राजशेखर यांच्याकडे वीज, आरोग्य, महिला व बालकल्याण, संग्रहालय या खात्याचा ताबा देण्यात आला आहे. अजित रॉय यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव, क्रीडा व युवा व्यवहार, माहिती-तंत्रज्ञान या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. हेमंत कुमार यांच्याकडे सर्वसाधारण प्रशासन, प्रोटोकॉल, राज्य कर आयुक्तपदाचा कारभार देण्यात आला आहे.