सचिन वाझे यांची उच्च न्यायालयात धाव

0
81

अंबानी स्फोटके प्रकरणातील निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी आपल्या अटकेविरुद्ध उच्च न्यायालयात काल धाव घेतली. एनआयएने नुकतीच त्यांना अटक केली आहे. यासंदर्भात वाझे यांनी मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस् याचिका दाखल करून सदर अटकेस आव्हान दिले आहे. योग्य प्रक्रियेचा अवलंब न करता राष्ट्रीय तपास संस्थेने आपल्याला अटक केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. वाझे यांना शनिवारी बारा तास चौकशीअंती अटक करण्यात आली होती.

आयपीएलप्रकरणी खंडणी
मागितल्याचा वाझेंवर आरोप

अंबानी स्फोटके प्रकरणात नुकतीच अटक झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा आयपीएल खंडणी घोटाळ्यात हात असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नुकताच केला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे नातलग वरुण सरदेसाई आणि वाझे यांचे संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला. आयपीएल सामन्यांपूर्वी वाझे यांनी सट्टेबाजांना बोलवून दीड कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती असा आरोप राणे यांनी केला.
दरम्यान, संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळले व नितेश राणे यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला भरणार असल्याची घोषणा केली.