येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या काही आमदारांना उमेदवारी मिळणार नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी देणे शक्य नसल्याचे सांगून कुठल्याही राज्यात तसे होत नसल्याचे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.
आमदारांशी त्यांच्या मतदारसंघातील लोकांशी कसे संबंध आहेत तसेच सर्वेक्षणात त्यांच्याविषयी मतदारांचे काय म्हणणे आहे याचा उमेदवारी देताना विचार करण्यात येणार असल्याचे यावेळी डॉ. सावंत यांनी नमूद केले.
आम्ही उमेदवारांची येऊन शिफारस करणार असलो तरी त्यांना उमेदवारी द्यावी की नाही याचा निर्णय भाजप पक्षाच्या केंद्रीय संसदीय समितीच घेणार असल्याचे डॉ. सावंत यांनी शेवटी स्पष्ट केले.