सायबर फॉरेन्सिक लॅब रायबंदर येथे कार्यान्वित

0
31

सायबर गुन्ह्यांच्या तपासणीसाठी महत्त्वाची ठरणार असलेली सायबर फॉरेन्सिक लॅब काल रायबंदर येथे कार्यान्वित झाली. अशा प्रकारची गोव्यातील ही पहिलीच लॅब असून ह्या लॅबमुळे आता राज्यात सायबर गुन्ह्यांच्या तपासकामाला वेग येणार आहे. गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागात ही लॅब सुरू करण्यात आली आहे.

राज्यात सध्या सायबर गुन्हे प्रकरणांत दिवसेंदिवस वाढ होऊ लागलेली आहे. मात्र, त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच गुन्ह्यांचा तपास सध्या होतो आहे. तर पुरेशा साधनसामुग्रीच्या अभावी असंख्य प्रकरणे तपासाविना रेंगाळत आहेत. तसेच या गुन्ह्यांचा तपास कसा करावा याचे पुरेसे प्रशिक्षण नसल्यामुळेही राज्यातील सायबर गुन्हे विभाग निष्क्रीय ठरला आहे.

अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी संगणकाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. मात्र, त्याच मनुष्य बळाचा गोवा पोलीस खात्यात अभाव आहे. मात्र, आता ही सायबर फॉरेन्सिक लॅब कार्यान्वित झाल्याने या गुन्ह्यांचा तपासकाम करण्यास मदत होणार आहे.