सक्रिय रुग्णसंख्या १ हजारांच्या पार

0
11

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ सुरूच असून, सक्रिय कोरोनाबाधित रुग्णसंख्येने १ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १००६ झाली आहे. चोवीस तासांत नवीन ९८ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण १४.१६ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३९५७ एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ६९२ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. मागील चोवीस तासांत आणखी ५२ जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के एवढे आहे.