सिली सोल्स प्रकरणी १२ सप्टेंबरला सुनावणी

0
17

आसगाव येथील सिली सोल्स रेस्टॉरंट अँड बारच्या बेकायदेशीरपणे केलेल्या अबकारी परवाना नूतनीकरण प्रकरणी दाखल तक्रारीवर अबकारी आयुक्त नारायण गाड यांनी काल सुनावणी घेतली. ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांनी सिली सोल्सच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अबकारी परवान्याचे नूतनीकरण मृत व्यक्तीच्या नावे केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. यावेळी प्रतिवादींकडूनही काल युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणी पुढील सुनावणी आता १२ सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे.