सक्रिय कोरोन रुग्णसंख्या ७५ वर

0
18

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १० कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, एका रुग्णाला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ७५ एवढी झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन ४२४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील १० स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यातील कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण २.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८३२ एवढी आहे. चोवीस तासांत आणखी १२ जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४१ टक्के एवढे आहे.