Home बातम्या संसदेचे हिवाळी अधिवेशन २४ नोव्हेंबरपासून

संसदेचे हिवाळी अधिवेशन २४ नोव्हेंबरपासून

0

भरगच्च विधिमंडळ कार्यक्रम असलेले संसदेचे हिवाळी अधिवेशन २४ नोव्हेंबरपासून सुरू होत असून २३ डिसेंबरपर्यंत चालेल. या काळात ३० ते ३५ विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहात मिळून ६७ विधेयके प्रलंबित असून त्यावर पुढील प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. नव्या लोकसभा सदस्यांच्या बसण्याच्या जागा निश्‍चित करण्याचे काम सध्या चालू असल्याचे सांगण्यात आले.