पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांना २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. प्रवीण राऊत याच्या पत्नीशी केलेल्या पन्नास लाखांच्या एका व्यवहारासंदर्भात ही चौकशी केली जाणार आहे असे सांगण्यात येते. एका मालमत्तेच्या खरेदीसंदर्भात घेतलेल्या कर्जाचा हा व्यवहार आहे.
सक्तवसुली संचालनालयाने ३ ऑक्टोबरपासून पीएमएलए कायद्या अंतर्गत हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर्स (एचडीआयएल) चे राकेशकुमार वाधवान, सारंग वाधवान व इतरांविरुद्ध तसेच पीएमसी बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या तक्रारीसंदर्भात ही चौकशी केली जात आहे. त्याच प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने वर्षा राऊत यांना ही नोटीस बजावली आहे.