श्रीलंकेकडून जयललितांची माफी

0
113

लष्कराच्या वेबसाईटवर अवमानकारक मजकूर
श्रीलंकेच्या लष्कराच्या वेबसाईटवर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासंदर्भात अवमानकारक मजकूर प्रसिध्द केल्या प्रकरणी अखेर श्रीलंका सरकारतर्फे जयललिता यांची बिनशर्त माफी मागण्यात आली.
जयललिता यांच्या संदर्भात सदर वेबसाईटवर मजकूर प्रसिध्द करून त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्राफिक प्रतिमा जोडण्यात आली होती. मजकुराला ‘जयललितांची नरेंद्र मोदी यांना पाठवलेली प्रेमपत्रे किती अर्थपूर्ण आहेत?’ असा मथळा देण्यात आला होता. मात्र हा मजकूर प्रसिध्द झाल्यानंतर तामिळनाडूतील सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष एक होऊन त्यांनी आवाज उठवला. तसेच जयललिता यांनी तातडीने पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क साधून या घटनेकडे त्यांचे लक्ष वेधले. नंतर मजकूर काढून टाकण्यात आला असला तरी बदनामी झाल्याचा दावा जयललिता यांनी केला व श्रीलंकेकडून बिनशर्त माफीची मागणी केली. राज्यभरात यामुळे विविध पक्षांनी श्रीलंकेविरोधात निदर्शनेही केली.