एसटींसाठी राखीव जागांपैकी १९१ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू

0
127

आदिवासी कल्याणमंत्री तवडकरांची माहिती
विविध खात्यांत अनुसूचित जमातींसाठी (एसटी) राखीव असलेल्या जागांपैकी १९१ पदे भरण्यासाठीची प्रक्रिया चालू करण्यात आली असल्याची माहिती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी काल विधानसभेत दिली. पांडुरंग मडकईकर यानी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
कुठे कुठे घरे आहेत त्याची माहिती देताना नगरपालिका, पंचायती, महामंडळे, अनुदानित विद्यालये आदीचा उल्लेख उत्तरांत नसल्याचे यावेळी मडकईकर यांनी मंत्र्यांच्या नजरेत आणून दिले. आपल्या प्रश्‍नाला दिलेले उत्तर अपूर्ण असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, आमदाराला जी माहिती हवी आहे ती विविध खाती व महामंडळे यांच्याकडून मिळवावी लागेल. उद्या त्यांच्याकडून आलेली माहिती चुकीची असल्यास त्यासाठी मंत्र्याला जबाबदार धरण्यास येणार असल्याचे ते म्हणाले. पंचायत खाते, शिक्षण खाते आदी खात्यासंबंधीची माहिती आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री कसे देऊ शकतील असा सवाल त्यांनी केला असता मडकईकर म्हणाले की आपण विचारलेला प्रश्‍न हा आदिवासींसाठी असलेल्या राखीव नोकर्‍यासाठीचा आहे. त्यामुळे त्याचे उत्तर देणे ही जबाबदारी त्यांचीच आहे. यावेळी सदर प्रश्‍नावरून मंत्री व आमदार यांच्यात शाब्दीक चकमकही झाली.
या पदांसाठीचा बॅकलॉग भरला जात नसल्याचा आरोप यावेळी मडकईकर यानी केला. तर काही पदांसाठी अनुसूचित जमातीतील उमेदवारच मिळत नसल्याचे यावेळी तवडकर यानी नजरेस आणून दिले.
१०९ प्राथमिक शिक्षकांच्या जागा अनुसूचित जमातींतील उमेदवारांसाठी होत्या. पण प्रत्यक्षात त्यासाठी ३७ उमेदवारच मिळू शकल्याचे तवडकर यानी सांगितले.