जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरजवळील एचएमटी भागात तीन दहशतवाद्यांनी अचानक लष्कराच्या जवानांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान गंभीररित्या जखमी झाले, त्यानंतर उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तीन दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन जवान गंभीररित्या जखमी झाले, त्यानंतर त्यांचे निधन झाले. जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादी एका कारमधून घटनास्थळावरून फरार झाले, त्यांच्याजवळ हत्यारे होती. दरम्यान, हा परिसर सील केला असून लष्करातर्फे शोधमोहीस सुरू करण्यात आली आहे.