एक देश एक निवडणूक ही गरज

0
260

>> पंतप्रधानांचे संविधान दिनी प्रतिपादन

एक देश एक निवडणूक ही देशाची गरज आहे. देशात प्रत्येक महिन्यात कोणत्या ना कोणत्या ठिकाणी निवडणुका होत असतात. यावर विचार सुरू केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले काल गुरूवारी केवडिया येथे संविधान दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते संबोधित करत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. आपण पूर्णत: डिजिटल होण्याकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. कागदांचा वापरही पूर्णपणे बंद केला पाहिजे. स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्षाकडे पाहता आपण हे लक्ष्य साधले पाहिजे असे आवाहन मोदी यांनी केले.

संविधान भग कर्‍ण्याचे प्रयत्न झाले त्या त्या वेळी संविधानानेच उत्तर दिले आहे. १९७० च्या दशकातील आणीबाणी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आणीबाणीनंतर यंत्रणा अधिक मजबूत होत गेलली आणि आपल्याला खूप काही शिकायलाही मिळाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
प्रत्येक नागरिकाने संविधान समजून घ्यावे. संविधानाच्याच मार्गाने सर्वांनी चालले पाहिजे. विधानसभेच्या चर्चांदरम्यान जनतेचा सहभाग कसा वाढेल यावर विचार केला गेला पाहिजे. जेव्हा कोणत्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होते तेव्हा त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही बोलावण्यात यावे असे मतही मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.