श्रीकांतचे पॅकअप

0
67

जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरील भारतीय खेळाडू किदांबी श्रीकांत याला २८व्या स्थानावरील वॉंग वी की व्हिन्सेंट याच्याविरुद्ध २१-२३, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यापूर्वी श्रीकांतचा व्हिन्सेंटविरुद्ध ५-२ असा रेकॉर्ड होता. श्रीकांतप्रमाणेच एच एस प्रणॉय यालादेखील स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे.

थायलंडच्या कांताफोन वांगचारियोन याने प्रणॉयला २१-१२, १५-२१, २१-१५ अशी धूळ चारली. अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांनी मात्र महिला दुहेरीच्या ‘अंतिम ८’ जोडींमध्ये स्थान मिळविले. त्यांनी मलेशियाच्या चोव मेई कुआन व ली मेंग यियान यांचा २१-१७, १६-२१, २१-१९ असा पराभव केला. आज त्यांचा सामना चीनच्या चेन क्विंगचेन व जिया यिफान या जोडीशी होणार आहे. सायना नेहवाल. पी.व्ही. सिंधू, सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी, मनू अत्री-सुमिथ रेड्डी यांचे सामनेदेखील आज होणार आहेत.