शेवटच्या क्षणापर्यंत राजीनामा नाही

0
19

>> इम्रान खान यांचे देशवासीयांना संबोधन

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल देशाला संबोधित करताना आज पाकिस्तानसाठी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पाकिस्तान माझ्यापेक्षा केवळ पाच वर्षांनी मोठा असून आपण येथली पहिली पिढी आहोत. पाकिस्तानचा निर्णय रविवारी होईल. संसदेत मतदान होईल. पण, इम्रान राजीनामा देईल, असे जे म्हणणार्‍यांनी इम्रान शेवटच्या क्षणापर्यंत राजीनामा देणार नाही.शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानात राहीन असा इशारा दिला.
पुढे बोलताना इम्रान यांनी, मी झुकणार नाही आणि माझ्या समाजालाही मी झुकू देणार नाही. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात आहे असेही सांगितले.

काल अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्यापूर्वीच संसदेचे कामकाज ३ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले. यावेळी इम्रान खान देशात आपल्या बाजूने वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नात असून याच पार्श्वभूमीवर काल त्यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाला अस्थिर करण्यात अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला. तसेच, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीङ्ग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी आरोप केले. बरखा दत्त यांनी आपल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे नेपाळमध्ये नवाझ शरीङ्ग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुपचुप भेटायचे. लष्कराने कारवाई करू नये म्हणून मोदींसोबत बोलणी करायचे. आज तेच लोक मला काढून सत्तेत येण्याचा विचार करत आहेत. त्यांना ङ्गक्त सत्ता हवी आहे, त्यांच्या मनात देशाबद्दल कुठलीही भावना नाही. येत्या रविवारी देशाचा निर्णय होईल. हा देश कोणत्या मार्गाने जाणार हे ठरवले जाईल. पण मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहीन. मी पुन्हा नव्याने उभा राहून तुमच्यासमोर येईन असे इम्रान यांनी शेवटी सांगितले.