Home Featured शेळवण – होडारच्या लोकांनीपुकारले जेटीविरोधात आंदोलन

शेळवण – होडारच्या लोकांनीपुकारले जेटीविरोधात आंदोलन

0

चिंबल आणि पाळे-शिरदोन पाठोपाठ आता लोण शेळवण-होडार येथील लोकांनीही आंदोलनाचे अस्त्र उपसल्याचे चित्र काल पहावयास मिळाले. शेळवण-होडार येथील ‘मल्टिबर्थ कार्गो जेटी’च्या विरोधात तेथील जनतेने आता दंड थोपटले असून या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी असोल्डा (केपे) येथील नागरिकांनी काल आपल्या गावातील ‘पर्यावरण वाचवा’ असा नारा देत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण खात्याच्या पाटो-पणजी येथील कार्यालयावर मोर्चा नेला. या मोर्चातही महिलांची संख्या लक्षणीय होती. त्याशिवाय ज्येष्ठ पुरुष नागरिक, युवक व मध्यमवयीन पुरुष व महिलांची संख्याही मोठी होती. यावेळी बोलताना अमित पाटकर यांनी स्थानिक लोकांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भाजप आमदार नीलेश काब्राल यांनीही घटनास्थळी येऊन आपला पाठिंबा व्यक्त केला. तत्पूर्वी पाटकर व काब्राल यांच्यात वाक्‌‍युध्ददेखील रंगले.