राज्यात काल शुक्रवारी कोरोनामुळे एकाच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाने बळी गेलेल्यांची एकूण संख्या सध्या ८०४ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले काल ८२ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ५५,७५८ एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ७४५ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के झाले आहे. तसेच काल राज्यात ४० जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ५४,२०९ एवढी झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
काल खात्यातर्फे १७२७ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. कोरोना संसर्ग झालेल्या १६,१०६ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २९,८९१ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत.
पणजीत रुग्ण वाढले
उत्तर गोव्यात पणजीत व दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. पणजीत ११२ रुग्ण असून मडगावात रुग्णसंखअया १०६ झाली आहे. चिंबलमध्ये ५५, म्हापसा ४७, तर पर्वरीत ४० रुग्ण आहेत. वास्को ४९, फोंड्यात ४३, कासावली ३६, कुठ्ठाळीत ३१ जण उपचार घेत आहेत.