दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा केरळच्या राज्यपालपदी उद्या मंगळवारी शपथविधी होणार आहे. त्यासाठी त्या आज तिरुवनंतपूरमला रवाना होणार आहेत.
दिल्लीचे माजी पोलिस प्रमुख राहिलेले निखिल कुमार यांची जागा शीला दीक्षित घेणार आहेत. दीक्षित यांनी १९९८ ते २०१३ या कालावधीत दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले.