शिवसेनेचे केंद्रीय मंत्रिमंडळातील एकमेव मंत्री अनंत गीते लवकरच राजीनामा देणार असल्याचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले. २५ वर्षांपासूनची भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर शिवसेना यावेळी स्वतंत्रपणे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेहून परतल्यानंतर गीते त्यांना भेटून राजीनामा सादर करतील असे ठाकरे यांनी सांगितले.