शापोरा नदीत रेती व्यवसायावर छापा

0
91

महाखाजन – धारगळ येथील शापोरा नदीत रेती व्यवसायावर काल खाण खात्याच्या पथकाने पोलिसांबरोबर छापा टाकून ११ कामगारांना अटक केली तसेच एक ट्रक जप्त केला. महाखाजन – धारगळ येथे काही कामगार ट्रकमध्ये रेती भरत असताना खात्याच्या पथकाने हा छापा टाकला. यावेळी ११ कामगारांना अटक करण्यात आली. ते सर्व उत्तर प्रदेश येथील आहेत. पेडणे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर पुढील तपास करीत आहेत.