शिक्षण संचालकांना घेराव

0
80

कंत्राटी तत्त्वावर असलेल्या वेगवेगळ्या विद्यालयातील बिगर शिक्षकी कर्मचार्‍यांनी बबिता देसाई व रुपाली देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण संचालक गजानन भट यांना घेराव घातला. यावेळी त्यांनी या शिक्षकांना सेवेत नियमित करण्याची मागणी केली. संचालक श्री. भट यांनी त्यांना याबाबत प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. तत्पूर्वी त्यांनी शिक्षण सचिवांचीही भेट घेतली होती. सेवेत नियमित करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी निमशिक्षक गेल्या काही महिन्यांपासून पर्वरी येथील सचिवालयासमोर आंदोलन करीत आहेत. मागण्या पूर्ततेसाठी यापूर्वी त्यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन बोलणी केली होती. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यांना आंदोलन सोडून चर्चेस आल्यास मागण्यांवर विचार करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, तरीही त्यांनी काल शिक्षण संचालकांना घेराव घातला.