केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर काल अण्णा हजारेंच्या समर्थकांनी निदर्शने केली. सुमारे ५० युवक काल दुपारी पवार यांच्या ६ जनपथ रस्त्यावरील निवासाकडे पोचेले व सरकारविरोधी घोषणा देऊ लागले. त्यांनी कंपाऊंडच्या आत घुसण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी निदर्शकांना ताब्यात घेतले.
दरम्यान, टीम अण्णाने या निदर्शनात आपला काहीही सहभाग नसल्याचे म्हटले आहे. शनिवारी अण्णा समर्थकांकडून पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरही घोषणाबाजी करण्यात आली होती.