Home बातम्या व्रतस्थ धोंडाचानदीत बुडून मृत्यू

व्रतस्थ धोंडाचानदीत बुडून मृत्यू

0

व्रतस्थ धोंड असलेल्या दामोदर नाईक (23, रा. काजीवाडा-विठ्ठलापूर) या तरुणाचा वाठादेव-डिचोली येथील नदीत काल बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दामोदर नाईक आणि अन्य धोंड वाठादेव येथे नदीकाठी एकत्र राहून व्रताचरण करत आहेत. कालच्या अमावस्येपासून काही नवीन धोंड मंडळी व्रत करतात, त्यानुसार काही धोंड वाठादेव येथे डिचोली नदीत स्नान करत होते, त्यावेळी सदर तरुण त्या ठिकाणी स्नान व कपडे भिजवण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी पाणी पातळी कमीच होती; मात्र त्या ठिकाणी त्याला फिट आल्याने तो पाण्यात पडला. काही वेळ तसाच पाण्यात राहिल्याने तो बुडाला. काही वेळानंतर इतरांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्याला लगेच पाण्याबाहेर काढले. मात्र त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर डिचोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.