व्याख्यातेपदांसाठी राखीव श्रेणीतील उमेदवारांच्या यादीचा प्रस्ताव

0
78

राज्य सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाचा ओबीसी, एससी, एसटी, दिव्यांग या राखीव श्रेणीतील महाविद्यालयातील व्याख्याते पदासाठी पात्र उमेदवारांची माहिती एकत्रित करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच उच्च शिक्षण क्षेत्रात व्याख्याते म्हणून कार्य करू इच्छिणार्‍या वरील समाजातील विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याच्या विचारात संचालनालय आहे.

उच्च शिक्षण संचालनालयाने वरील माहिती गोळा करण्यासाठी एक प्रश्‍नोत्तरी तयार केली आहे. ही प्रश्‍नोत्तरी महाविद्यालये, विद्यापीठ, शिक्षण संस्था या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहेत. महाविद्यालयामध्ये व्याख्याते होऊ इच्छिणार्‍या ओबीसी, एससी, एसटी, दिव्याग उमेदवारांनी वरील प्रश्‍नोत्तरी भरून ३१ जानेवारी २०१८ पर्यत महाविद्यालय, विद्यापीठात सादर करावी. उमेदवार ही प्रश्‍नोत्तरी उच्च शिक्षण खात्याच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घेऊ शकतात. तसेच पर्वरी येथील कार्यालयात सादर करू शकतात, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

राखीव श्रेणीतील पदासासाठी योग्य उमेदवार मिळत नसल्याने अनेक पदे रिक्त ठेवावी लागत आहेत, असे निदर्शनास आले आहे. तसेच राखीव श्रेणीतील पदे योग्य पात्रता असलेले उमेदवार मिळत नसल्याने सर्वसामान्य श्रेणीसाठी खुली करण्यात आल्याने राखीव श्रेणीतील पात्र उमेदवारांना रोजगार मिळत नाही, असेही आढळून येत आहे. हा गोंधळ दूर करण्यासाठी राखीव श्रेणीतील उमेदवारांची यादी तयार करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. उच्च शिक्षण खात्याचा एनईटी आणि एसईटी परीक्षा उत्तीर्ण होऊ इच्छिणार्‍या उमेदवारांचा माहिती गोळा केली जाणार आहे. या उमेवारांना या परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्याचा प्रस्ताव आहे. एनईटी आणि एसईटी पात्र उमेदवारांच्या अभावामुळे व्याख्यात्यांची अनेक पदे रिक्त ठेवावी लागत आहेत.