Home बातम्या वेळगे-पाळी येथे सर्पदंशामुळे मुलाचा मृत्यू

वेळगे-पाळी येथे सर्पदंशामुळे मुलाचा मृत्यू

0

सर्पदशांमुळे फोंडामळ वेळगे पाळी येथील साजीद रुस्तम अन्सारी या सात वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती डिचोली पोलिसांनी दिली.

सर्पदंशानंतर साखळी येथील आरोग्य केंद्रात आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने त्याला बांबोळी येथे नेताना वाटेतच त्याचे निधन झाले.

साजीद आपल्या घरात झोपला असताना त्याला सापाने दंश केला. लगेच उठून आपल्याला काही चावल्याचे त्याने आईला सांगितले. त्यानंतर त्याला साखळीत इस्पितळात आणले मात्र तेथे आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने तातडीने बांबोळी नेताना वाटेतच निधन झाले. दुपारी या मुलाला सापाने दंश केला असता याबाबत प्राणीमित्र अमृतसिंग यांना दूरध्वनीवरून माहिती देताच त्यांनी वन्यजीव संरक्षण सदस्य हसन शेख यांना घटनास्थळी रवाना केले. त्या घरात जो साप मुलाला चावला तो नागसाप होता व ३ फूट असल्याचे अमृतसिंग यांनी सांगितले.