वेदांता कर्मचारी संघटनेचे मंत्री ढवळीकरांना निवेदन

0
115

बेरोजगारीच्या संकटामुळे वेदांता (सेझा) कामगार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी काल मंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट नोटिशीविषयी सविस्तर माहिती दिली. मंत्री ढवळीकर यांनी कामगारांचे म्हणणे समजून घेऊन त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कल्पना देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुढील कृतीबाबत विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाला दिल्याने नीलेश कारबोटकर व किशोर लोकरे यांनी सांगितले. कामगारांच्या समस्या व कंपनीने बजावलेली नोटीस यामुळे कामगारात खळबळ माजली असून कामगारांचे हित लक्षात घेऊन तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी कामगारांनी मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे केली. समस्या व भविष्यातील भीती याबाबत सविस्तर माहिती कामगार शिष्टमंडळाने यावेळी मंत्र्यांना दिली.