वन मावळिंगे येथे शुक्रवारी जोरदार वीज पडून बाबलो चंद्रकांत खरपालकर यांच्या घराची हानी झाली. त्यांची १४ वर्षीय मुलगी जखमी झाली असून तिच्यावर डिचोली आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेने खरपारकर यांच्या घराचे ५० हजारांचे नुकसान झाले. डिचोलीतही मोठ्या प्रमाणात वीज उपकरणे जळून हानी झाली आहे.
दरम्यान, आमोणा येथे एकाने गळफास लावून आत्महत्या केली. त्याचे नाव राजेश कुमार (४५) असून तो मूळ बिहारचा असल्याचे समजते. आमोणा येथे भाड्याच्या खोलीत त्याने नॉयलॉन दोरीने फास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बांबोळी शवागृहात ठेवला आहे.