आपण वीज व्यवस्थापन प्रश्नावर चर्चा करण्याचे आव्हान कुणाला दिले नव्हते. दोन राज्यातील वीज व्यवस्थापनासंबंधी चर्चा केवळ दोन मंत्र्यांमध्ये होऊ शकते, असे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
माझ्या कार्यालयात कुणीही येऊन वीज व्यवस्थापनावर चर्चा करू शकतो. मात्र, दोन राज्यांतील वीज व्यवस्थापनावर चर्चा ही दोन्ही राज्यांच्या मंत्र्यांमध्ये झाली पाहिजे. एका आमदाराशी दोन राज्यातील विषयावर चर्चा केली जाऊ शकत नाही. अशा प्रकारची चर्चा करताना शिष्टाचार सांभाळणे गरजेचे आहे, असेही वीजमंत्री काब्राल यांनी सांगितले.
आम आदमी पक्षाचे नवी दिल्ली येथील आमदार राघव चंद्रा यांनी दोन राज्यातील वीज व्यवस्थापनावर चर्चेला तयार असल्याचे जाहीर केले होते. आपण १७ नोव्हेंबरला गोव्यात येत असून गोव्याचे वीजमंत्री काब्राल यांनी चर्चेची वेळ व ठिकाणी जाहीर करण्याचे आव्हान दिले होते. दरम्यान, भाजप वीजमंत्री काब्राल यांना वीजप्रश्नी चर्चा करायला मान्यता देत नाही, असा आरोप राघव चंद्रा यांनी केला आहे.