राज्यहितावरील लिखाणात पारदर्शकता ठेवा

0
97
????????????????????????????????????

>> राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे आवाहन

जेव्हा राज्याच्या हिताचा विषय समोर असतो तेव्हा खर्‍या माहितीवर भर देणे आवश्यक आहे. एखाद्या विषयावर एकतर्फी, विपर्यास माहितीमुळे राज्याचे आर्थिक नुकसान होऊ शकते. राज्यातील पर्यटन, पर्यावरण, उद्योग या महत्त्वाच्या विषयावर लिखाण करताना शक्यतो पारदर्शकता ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित राष्ट्रीय पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना केले.

पुरस्कारांचे वितरण
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार सीताराम टेंगसे यांना जीवनगौरव पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार विल्फेड परेरा, अनंत साळकर, सुरेश वडावडेकर, सुरेश नाईक, सोयरू कोमरपंत यांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते गोवा राज्य पत्रकार पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा या विषयावरील उत्कृष्ट संपादक पुरस्कार दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांना प्रदान करण्यात आला. प्रसाद शेट काणकोणकर, सिद्धार्थ कांबळे, महेश गावकर, गणेश शेटकर, मार्कुल मेर्गुलाव यांना पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आले.

छायाचित्र स्पर्धेत राजतिलक नाईक यांनी प्रथम नारायण पिसुर्लेकर यांनी द्वितीय, मयूर नाईक यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. कोविड साधनसुविधा विषयावरील छायाचित्र स्पर्धेत उपेंद्र नाईक यांनी द्वितीय, अमेय नाईक यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक सुधीर केरकर यांनी स्वागत केले. र श्याम गावकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माहिती खात्याचे सचिव संजय कुमार यांची उपस्थिती होती.